BJP MP-MLA Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर आता भाजपने खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असून आगामी निवडणुकी संदर्भात देखील चर्चा होणार आहे. ही बैठक 13 जुलै रोजी बोलवण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीने (BJP) आगामी महापालिका निवडणूक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार आणि कोअर कमिटीतील सदस्यांसह निवडणूक प्रमुखांची आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील निवडणुका संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत होणार आहे या बैठकीत पुढील भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये 45 खासदार निवडून आणण्याचे तयारी असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याची जबाबदारी राज्यातील नेतृत्वाला दिले असल्याने ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कशाप्रकारे कामाला लागायचं यामध्ये बैठकीत सूचना देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस राज्याच्या सत्तेत सामील झाल्याने भाजपला कशाप्रकारे फायदा होणार आहे. पुढील निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशाप्रकारे निवडणुकीला समोर जाणार यावर देखील चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्याने काही भाजपमधील नाराज असलेल्या लोकांची नाराजी कशाप्रकारे दूर करायची या संदर्भात देखील विचार करण्यात येणार आहे. तसेच या त मध्ये निवडणुकी संदर्भात जागा वाटपा संदर्भातील कशा प्रकारे निर्णय घेता येईल या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. (Maharashtra Politics)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.