Vidya Chavan- Amruta Fadanvis  Sarkarnama
मुंबई

'वहिनी नोटीस मिळाली का?' म्हणत विद्या चव्हाणांनी अमृता फडवीसांना पुन्हा डिवचलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया याला अटक करण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया याला अटक करण्यात आली. जितेन हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचं सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणावरुन आता राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे. अमृता फडणवीसांनी यांनी विद्या चव्हाणांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

वहिनी मिळाली का नोटीस? असा सवाल करत त्यांनी अमृता फडणवीसांना डिवचलं आहे. बँक खाती हस्तांतरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळेच विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीसांना ट्विट करत टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजप आयटी सेलचा गजारिया याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. या मुद्द्यावरुन विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढले. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाही, हेच मला भाजपला सांगावे वाटते, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. मात्र हा वाद आता कोर्टात पोहोचला असून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

विद्याताई चव्हाणांनी केलेल्या डान्सिंग डॉलच्या उल्लेखामुळे अमृता फडणवीस मात्र कमालीच्या संतापल्या आहे. अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलहाच्या मुद्द्यावरुन पटलवार केला. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!' असा इशाराच फडणवीस यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT