Sushma Andahare
Sushma Andahare Sarkarnama
मुंबई

शिंदे गटात प्रवेशापुर्वीच पती वैजनाथ वाघमारेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा

सरकारनामा ब्युरो

Sushma Andhare : मुंबई : ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून सुषमा अंधारे यांच्याकडे पाहिले जाते. तीन महिन्यांतच आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण बोलण्यातून त्यांनी भाजप आणि शिंदे गटालाही विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. पण आता अंधारेंना शह देण्यासाठी नवी चाल खेळली आहे. अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनाच शिंदे गटाने गळाला लावलं आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. हा सुषमा अंधारेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे.

दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यापुर्वीच वाघमारेंनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे या मुलुख मैदानी तोफ आहेत का? असं विचारलं असता, असं काही नाही. तोफ वगैरे काही नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्ट्या परिपक्व करणारा मीच आहे, असा दावा वाघमारे यांनी केला आहे. तसेच, त्यांच्यासोबत आपले कोणतेही मतभेद नसून ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले म्हणून त्या तिकडे गेल्या आणि मला एकनाथ भाईंचे विचार आवडले म्हणून मी इकडे आलो, असं वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा विद्रोही आणि क्रांतिकारक स्वभावामुळे मी त्यांच्याकडे आलो. असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हा प्रवेश करत असल्याचं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्यासारख नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं. त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो, असंही वाघमारे यांनी सांगितलं.

तसेच, मागील पाच सात वर्षांपासून मी सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त राहत आहोत, असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका मला पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. पण अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने थेट अंधारे यांच्याच घरातच फुट पाडली आहे. अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न करून शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. आता शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला आता सुषमा अंधारे कसं उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT