Prakash Ambedkar  Sarkarnama
मुंबई

Prakash Ambedkar on Pawar: पवार, राऊतांना आलेल्या धमकीवरून प्रकाश आंबेडकर मैदानात; सरकारला दिला 'हा' सल्ला

Sharad Pawar News : शरद पवार आणि संजय राऊत यांना आलेल्या धमकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याबरोबरच खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांना आलेल्या धमकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आंबेडकर म्हणाले, "शरद पवार व संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली. सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते, सत्ता जाते. पण सामान्य माणूस आणि नेता यांची दक्षता घेणं हे सरकारचं काम आहे. कुठलाही नेता किंवा सामान्य माणूस असुरक्षित होऊ नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकार ही काळजी घेईल, अशी आशा आम्हाला आहे", अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला सल्ला दिला. ते माध्यमांशी बोलत होते.

"पोलिसांनी शरद पवार व संजय राऊत या दोन्ही नेत्यांना सुरक्षा दिली पाहिजे. राजकीय नेते काय म्हणतात यापेक्षा पोलीस खात्याकडे महत्वाची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी", असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शरद पवार यांना धमकी देण्यात आल्यानंतर हा धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. या धमकीप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत त्यांनी ट्वीट करत या धमकी प्रकरणाबद्दलचा अधिक तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT