Rekha Thakur sarkarnama
मुंबई

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र दिनी 'शांतता मार्च' काढणार...रेखा ठाकूर

समाजात दंगे होऊ देणार नाही, Will not allow riots in the society हा वंचित बहुजन आघाडीचा Vanchit Bahujan Aghadi निर्धार असल्याचे मत रेखा ठाकूर Rekha Thakur यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांतता भंग होऊ नये या करीता एक मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 'शांतता मार्च' काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, ''राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडविण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक तेढ वाढवणारी भाषणे केली आहेत आणि म्हणून त्यांना औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. परंतू महाराष्ट्र सरकारचे वागणे अनाकलनीय आहे. त्यांनी या सभेला परवानगी दिली आहे.''

याचा अर्थ दंगे भडकविण्यासाठी महाविकास आघाडी पोषक आहे अशी परिस्थिती आहे. दंगली घडू नये म्हणून पायबंद घालण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे. ''स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रात दंगली भडकणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहे.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शांतीचा संदेश देणारा 'शांतता मार्च' एक मे रोजी काढण्यात येणार आहे.'' समाजात धार्मिक सद्भावना आणि सलोखा, शांती बिघडू न देणे, समाजात जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील हीच भूमिका प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मांडली होती.

याच धर्तीवर एक मे रोजी शांतता मार्चची जोरदार तयारी करण्यात येत असून त्याकरिता साडेसातशे युनिट कामाला लागले आहेत. हा शांतता मार्च यशस्वी करण्यासाठी वंचितचे सर्व स्तरावरील नेते, पदाधिकारी कायकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असल्याचे देखील रेखा ठाकूर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT