Uddhav Thackeray, Akhil Chitre Sarkarnama
मुंबई

Shiv Sena UBT vs MNS : मनसेला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंनी मुंबईतील नेता फोडला

Akhil Chitre Assembly Election Vandre East Assembly Constituency : मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी गुरूवारीला मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.

Rajanand More

Mumbai : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेच मनसेला हा झटका दिला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेसाठी मुंबईत हा मोठा धक्का मानला जात आहे.

अखिल चित्रे हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख होते. ते मनसेकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, माजी आमदार तृप्ती सावंत यांना अचानक उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे चित्रे काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती.

अखेर चित्रे यांनी गुरूवारी दुपारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्वचे पक्षाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. चित्रे यांच्या प्रवेशामुळे वरुण सरदेसाई यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. चित्रे यांनी 2019 मध्येही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना सुमारे 11 हजार मते मिळाली होती.

दरम्यान, अखिल चित्रे यांनी काहीवेळापूर्वीच सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना बडव्यांनी घेतले असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी सावध रहावे, असेही म्हटले आहे.

चित्रे यांनी म्हटले आहे की, ‘अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा, असो, जय महाराष्ट्र!’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT