Vasai Virar News: वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होऊन 3 महिने झाले तरी त्याठिकाणच्या प्रभागसमिती सभापती,परिवहन समिती सभापती, आरोग्य समिती आणि महिला आणि बालकल्याण समिती सभापतींची निवडणूक रखडली होती. प्रभाग समिती सभापतींच्या लांबलेल्या निवडणुकीवरून महापौर अजीव पाटील यांनी प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली होती.
महिला व बालकल्याण आणि आरोग्य समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक अखेर 8 मे होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची निवड करण्यात आली आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन तीन महिन्याचा कार्यकाळ लोटला असला तरी येथील स्वीकृत सदस्य,तसेच विविध समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका रखडल्या आहेत. रखडलेल्या निवडणुकीवर महापौर अजीव पाटील यांनी राज्य शासन आणि प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
अखेर आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. याबाबतच कार्यक्रम पालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांनी जाहीर केला आहे. त्यात 6 तारखेला 2 ते 5 या दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.
वसई विरार महापालिकेत शुक्रवारी (ता.1 मे) साडेपाच वाजता वजा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 8 तारखेला १२ वाजण्यापासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.
तसेच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्यांना आपली उमेदवारी मागे घ्यायची असेल त्यांना याच दिवशी आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. तसेच आवश्यक असल्यास त्याचदिवशी निवडणूक घेण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.