Vasai Virar Nivadnuk 2025: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील इनकमिंगचा वेग वाढला आहे. बाहेरुन आलेल्या माजी नगरसेवकांमुळे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
सत्तेसाठी बाहेरुन आलेल्या माजी नगरसेवक, नेत्यांना रोखण्यासाठी भाजपमधील निष्ठावंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कार्यकर्ते बंड करण्यात तयारी असल्याचे चित्र आहे. अन्य पक्षातून आलेल्यांना तिकीट देऊ नका, असे पत्र पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपाने वसई-विरार महापालिका जिंकण्याचा निर्धार केला आहे. आता वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडीमधील नाराज कार्यकर्ते, नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. बविआमधून भाजपामध्ये येणाऱ्यांना तिकीटाचे आश्वासन दिले जात आहे. यावरुन भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.
महापालिकेच्या सत्तेसाठी बहुजन विकास आघाडीतून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे आहेत. बविआमधून आलेल्यांना गुंडांना तिकीट देऊ नका, असे पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे.
सत्तेसाठी पक्षात प्रवेश घेणाऱ्यांना तत्काळ तिकीट देऊ नका, अशी मागणी ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षाकडे केल्याने बविआमधून भाजपात येणाऱ्या माजी नगरसेवकांचा हिरमोड होणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर धुरी, उत्तमकुमार ,नवघर माणिकपूर शहर अध्यक्ष महेश सरवणकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र देऊन पक्षात घेतलेल्याला पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. पक्षात आलेल्याना तत्काळ तिकीट दिल्यास यामुळे पक्षातील अनेक इच्छुक कार्यकत्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.