Vasai-Virar Municipal Corporation sarkarnama
मुंबई

Vasai-Virar Politics : वसई-विरार महापालिका निवडणुकीवर 'गुजरात'चा वॉच? विजयासाठी आरएसएसची रणनीती!

Vasai-Virar Elections RSS BJP VS BVA : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपसाठी आरएसएस निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. वसई-विरार महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी आरएसएसने रणनीती तयार केली आहे.

संदिप पंडित

Vasai-Virar News : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीची 35 वर्षांची सत्ता बदलण्यासाठी आरएसएसने पद्धतशीरपणे मोर्चे बांधणी केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मदतीचा हात देऊन दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच बहुजन विकास आघाडीसमोर (बविआ) आतापर्यंतचे सर्वात मोठे राजकीय संकट उभे ठाकले आहे.

आगामी वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्रे मागील दोन मोठ्या निवडणुकांप्रमाणेच थेट गुजरातहून हलवली जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी कट्टर आरएसएस पार्श्वभूमीच्या 'निरीक्षकांची' फौज तैनात करण्याची तयारी सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे. या घडामोडींमुळे वसई-विरारमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून ही निवडणूक 'बविआ'साठी केवळ सत्तेची नाही तर 'राजकीय अस्तित्वाची अखेरची लढाई' ठरण्याची चिन्हे आहेत.

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील संपूर्ण प्रचाराची रणनीती, उमेदवार निश्चिती आणि अगदी निरीक्षक नेमणुकाही गुजरातच्या आदेशानुसार झाल्या होत्या, ही बाब लपून राहिलेली नाही. त्यावेळी नेमलेले दोन्ही निरीक्षक हे कट्टर आरएसएस धाटणीचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उघडपणे झाली होती. त्याच 'पॅटर्न'ची आता मनपा निवडणुकीसाठी पुनरावृत्ती होत असल्याचे दिसते. वसई-विरारमधील 'बविआ'चे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी गुजरातमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आतापासूनच रणनीती आखली जात आहे.

या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांऐवजी थेट 'वरून' आलेल्या आदेशांनुसारच सर्व सूत्रे हलणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी गुजरात मधील आरएसएसचे वरिष्ठ गेल्या काही महिन्या पासून वसई विरार मध्ये ठाण मांडून बसले असून जवळपास २५० लोकांची टीम पद्धतशीरपणे प्रभागा प्रभागात फिरत आढावा घेत असल्याचे समोर येत आहे.

एकहाती विजयाची रणनीती

लोकसभा आणि विधानसभेनंतर भाजपने आपले संपूर्ण लक्ष पालघर जिल्हा परिषद, वसई पंचायत समिती आणि जिल्ह्याची 'तिजोरी' मानल्या जाणाऱ्या वसई-विरार महानगरपालिकेकडे केंद्रित केले आहे. संपूर्ण जिल्हा भाजपमय करणे आणि 'बविआ'चे राजकारण समूळ नष्ट करणे, हाच भाजपचा मुख्य मनसुबा असल्याची चर्चा आहे. यासाठीच मनपावर एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT