Vasai Virar News Sarkarnama
मुंबई

Vasai Virar News : वसईतील रूग्णालय जळीत प्रकरण; मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची नोटीस!

human rights commission : "सरकारी अधिकारी यांना दोषी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये?"

सरकारनामा ब्यूरो

Vasai Virar Vijay Vallabh Hospital Incident : वसई विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकुलित यंत्रांमुळे अतिदक्षता विभागाला (आयसीयू) 23 एप्रिल 2021 रोजी आग लागून 19 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) राज्याच्या मुख्य सचिवांनाच आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या संदर्भात ग्राहक पंचायतीचे अॅड. तुषार झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. याबाबत आयोगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना चौकशी करून सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान ही घटना वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत घडल्याचे सांगत, सार्वजनिक आरोग्य विभागाने हे प्रकरण महानगरपालिककडे हस्तांतरीत केले होते.

आयोगाने जानेवारी महिन्यात हे प्रकरण सुनावणीसाठी मुंबईत ठेवले होते. या वेळेस नगरविकास विभागाचे सचिव व वसई विरार महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. या वेळेस आयोगाला सादर केलेल्या अहवालात मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना पन्नास हजारांची भरपाई दिल्याचे त्यांनी नमूद केले. आयोगाने सर्व वस्तुस्थिती व तक्रारदार यांचे म्हणणे विचारात घेता, यामध्ये शासकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मत नोंदविले.

यात हद्दीचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकार जबाबदारी टाळू शकत नाही, त्यामुळे सरकारी अधिकारी यांना दोषी धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये? रुग्णांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याने मृतांच्या नातेवाईकांना अतिरिक्त दोन लाख व जखमींना दहा हजार रुपये आपणाकडून का वसूल करण्यात येवू नये? अशी कारणे दाखवा नोटीस राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगाने काढली आहे. याचा खुलासा चार आठवड्याच्या आत मुख्य सचिवांनी करायचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT