Vasai Virar News : वसई-विरार महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर आता स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पालिकेच्या आर्थिक नाड्या ज्याच्या हाती असतात. स्थायी समितीवर आपल्या विश्वासातील माणूस हवा हितेंद्र ठाकूर यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामध्ये प्रवीण शेट्टी यांचे नाव आघाडीवर आहे.
ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी किरवली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना तिजोरीच्या चाव्या माजी महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हातात देण्याचे संकेत दिले होते. सद्या महापौर आणि उपमहापौरपद हे विरारच्या वाट्याला गेल्याने स्थायी समिती सभापतीपद वसईमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.
महापालिकेची पहिली महासभा २० फेब्रुवारी पूर्वी होणार असल्याचे बोलले जात आहे. या सभेत स्थायी समिती सदस्य, विरोधी पक्ष नेता आणि इतर समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. बहुजन विकास आघाडीच्या बहुमतात असलेल्या सत्तेवर अंकुश ठेवणारा विरोधीपक्ष नेता म्हणून भाजप कोणाला संधी देणार याची देखील उत्सुकता आहे.
वसई-विरार महापालिकेची पाच वर्षांपासून रखडलेली निवडणूक पार पडली आणि महापौर आणि उपमहापौर हि विराजमान झाले आहेत. आता महापालिकेची पहिली महासभा २० फेब्रुवारी पूर्वी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवकपद मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठीं साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.