Vasant More joins Shiv Sena Sarkarnama
मुंबई

Video Vasant More: तारीख ठरली! वसंत मोरेंची उद्धव ठाकरेंना साथ; 'शिवबंधन' बांधणार

Vasant More Joins Shiv Sena Uddhav Thackeray: वसंत मोरे हे 2019 ची निवडणूक हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढले होते, त्यांनी ही निवडणूक मनसेकडून लढवली होती. वसंत मोरे हे 34 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

Roshan More

Vasant More News : मनसेची साथ सोडून 'वंचित'मध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढणाऱ्या वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली आहे. वसंत मोरे यांनी आज (गुरुवारी) उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. ते येत्या 9 जुलै रोजी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरे यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती.मात्र, लोकसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी मनसेची साथ सोडत 'वंचित'मध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या. ही चर्चा आज खरी ठरली. वसंत मोरे हे 2019 ची निवडणूक हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढले होते, त्यांनी ही निवडणूक मनसेकडून लढवली होती.

वसंत मोरे हे 34 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. चेतन तुपे यांचा विजय सुकर करण्यात आणि भाजपचे योगेश टिळेकर यांना पराभूत करण्यात वसंत मोरे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता.

खडकवासला की हडपसर?

वसंत मोरे हे हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र, या दोन्ही मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. हडपसरमधून प्रशांत जगताप तर, खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

लोकसभेत डिपाझिट जप्त

पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा तब्बल दीड लाखाने विजय झाला. वसंत मोरे यांना डिपॉझिट ही वाचवता आले नाही. निवडणुकीनंतर मोरे यांनी ते वंचित बहुजन आघाडीची साथ सोडणार नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याचे निश्चित केल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT