Ramraje Naik Nimbalkar, Rahul Narvekar sarkarnama
मुंबई

"माझे सासरे नक्की निवडून येतील ; भाजप आमदाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत विश्वास

साताऱ्यातील राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांचे आमदार रामराजेंना साथ देणार का, हे आज सांयकाळी समजेल.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसने दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार रिंगणात उतरवले आहे. या दोघांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली आहे. (Ramraje Naik Nimbalkar news update)

या साऱ्या घडामोडींत रामराजेंचे जावई आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची कसोटी लागणार आहे. एकीकडे सासरेबुवा आणि दुसरीकडे पक्षनिष्ठा असा पेच आहे.

विधान परिषदेचे( Vidhan parishad election 2022) मतदान हे गुप्त असल्याने ते पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवायचे नसते. त्यामुळे अशा नातेसंबंधांतील नेते कोणता राजकीय निर्णय या घडामोडीत घेणार, याची चर्चा होत राहणार आहे. "माझे सासरे नक्की निवडून येतील," असा विश्वास नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आज व्यक्त केला.

"या दोन्ही नेत्यांचा सर्व पक्षांत संपर्क आहे. त्यांच्या विजयात कोणतीच अडचण न येण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपच्या आमदारांशी संपर्क केला आहे, असे नार्वेकरांनी याआधी सांगितले होते.

नार्वेकर हे मूळचे शिवसेनेचे. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत संधी दिली. मात्र २०१९ च्या निवडणुकीआधीच नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत ते भाजपचे आमदार झाले.

रामराजेंचा सातारा जिल्ह्यातही प्रभाव आहे. तेथील इतर आमदारांशीही त्यांचा चांगला संपर्क आहे आणि राजकीय संबंधही आहेत. अनेक स्थानिक आघाड्यांत हे नेते एकत्र राहिले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांचे आमदार रामराजेंना साथ देणार का, हे आज सांयकाळी समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT