Shivsena Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election 2022 : आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेकडून व्हिप जारी

आमदार फुटू नये म्हणून खबरदारी म्हणून त्यांना हॉटेलवर ठेवलं आहे. मतदानाच्या दिवशी शिवसेना कार्यालयात सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकी प्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2022) शिवसेना (shivsena) आमदारांना पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. पक्षाने दिलेल्या निर्देश आणि आदेशानुसार मतदान करण्याचे शिवसेना आमदारांना सांगण्यात आलं आहे. २० जून रोजी मतदानात सहभागी होण्यासाठी विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी दहा वाजता हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. shiv sena issues whip to mlas

उद्या (ता.२०)विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह सर्वच पक्ष खबरदारी घेत आहेत. त्यानुसारच शिवसेना आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. आमदार फुटू नये म्हणून खबरदारी म्हणून त्यांना हॉटेलवर ठेवलं आहे. मतदानाच्या दिवशी शिवसेना कार्यालयात सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे.

पक्षादेशात काय लिहिलंय?

विधानपरिषद निवडणुकीचे मतदान सोमवारी २० जून 2022 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी सोमवारी दिनांक २० जून 2022 रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष 214, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी १० वाजता उपस्थित राहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन उमेदवार उभे आहेत. शिवसेनेच्या विधानसभेच्या सर्व सदस्यांनी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने मतदान करायचे आहे, प्राधान्यक्रम व सुचनेनुसार शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

व्हिप म्हणजे काय ?

व्हिप म्हणजेच पक्षादेश. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम व्हिपने करता येते. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदान करायचे असेल किंवा विरोधात मतदान करायचे असेल तर त्याबाबतचा आदेश व्हिपमार्फत जारी करण्यात येतो. व्हिप हा पक्षांच्या आमदारांना बंधनकारक असतो. व्हिप हा राजकीय पक्षाचा अधिकार असतो.

सभासदत्व धोक्यात येऊ शकते

कार्यकारी विधिमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हाच व्हिपचा हेतू असतो. एखाद्या पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक विचारसरणीनुसार निर्णय न घेता पक्षाच्या धोरणांनुसार मतदान करावे या हेतूने व्हिप काढला जातो. कोणत्याही आमदाराने हा आदेश धुडकावून पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केले, तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षशिस्तीची कारवाई तर होऊ शकतेच, शिवाय त्याला पदही गमवावं लागू शकतं. पक्षादेश (व्हिप) काढण्याचे अधिकार हे पक्षाने निवडलेल्या विधिमंडळ गटनेत्यालाच असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT