Rahul Narevekar Notice to Shivsena MLA's  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena MLA Disqualification: : विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीस

सरकारनामा ब्यूरो

Rahul Narwekar Notice to Shivsen MLA's : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे. सोबतच ठाकरे गटाच्याही 14 आमदारांनादेखील विधीमंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय प्रलंबित होता. वर्षभराच्या न्यायालयीन लढाईनंतर ११ मे रोजी याबाबत निकाल देत न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय दिला. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला सांगा या आशयाची याचिका सुनील प्रभूंकडून दाखल करण्यात येत आहे.

सुनील प्रभूंच्या या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

दरम्यान, आमदार अपात्रेबाबत न्यायालयाने सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे  दिले आहेत. मात्र, अध्यक्षांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने हा निर्णय आणखी लांबणीवर जाऊ शकतो. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती पाहता, अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांना तशा पद्धतीचे निर्देश देण्यात यावेत, अशा आशयाची याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे. (Shiv Sena MLA Disqualification)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT