Rahul Narwekar and Supreme Court Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification News : आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात मोठी अपडेट; राहुल नार्वेकर घेणार 'ही' भूमिका ?

Shiv Sena MLA Disqualification : राहुल नार्वेकर हे आपल्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करणार नसल्याची माहिती

Ganesh Thombare

Delhi News : शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईसंदर्भातील याचिकेवरील मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी नियोजित केलेले वेळापत्रक मान्य नसल्याचे न्यायालयाने सांगितले होते.

तसेच सुधारित वेळापत्रक मंगळवारपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यापूर्वीच तयार केलेले वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल नार्वेकर हे आपल्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करणार नसून गेल्या सुनावणीत सादर केलेले वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला सादर करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भातील वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने लेखी आदेश दिले, तरच आपण वेळापत्रकात बदल करणार, अशी भूमिका नार्वेकरांनी घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, याबरोबरच आम्ही सादर केलेल्या वेळापत्रकात नेमकी काय चुका आहेत, त्या न सांगता थेट दुसर वेळापत्रक मागवल्याने विधानसभा अध्यक्ष ही भूमिका घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जर सुधारित वेळापत्रक दिले नाही, तर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT