ashok chavan-ajit pawar dispute
ashok chavan-ajit pawar dispute 
मुंबई

अशोक चव्हाण- अजित पवार यांच्यात वाद झालेला नाही!

सरकारनामा ब्युरो

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही, असा खुलासा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मंत्रीमंडळ विस्तारापासून खातेवाटपाचा घोळ सुरू आहे. गुरूवारी रात्रीपर्यंत यावर मार्ग निघेल, असे सांगण्यात येत होते. मात्र निर्णय होवू शकला नाही. यासंदर्भाने काल दिवसभर तीन बैठका झाल्या. काँग्रेसला राष्ट्रवादीच्या कोट्यातील ग्रामविकास विभाग हवा आहे, शिवाय काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचाही वाद आहे. त्यासंदर्भाने चर्चा सुरू असताना अजित पवार व अजित पवार यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आज आल्या. त्यावर वडेट्टीवार यांनी आज खुलासा केला आहे. 

वडेट्टीवार म्हणाले, अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यात कोणातच वाद झालेला नाही. काही जण मुद्दाम अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. आमच्यात मतभेद व्हावेत यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित एक खाते मिळावे, अशी आमची आजही मागणी आहे. मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT