Maratha Reservation : सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मिटवावा अन्यथा सत्तेतून पायउतार व्हावं असं आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला दिलं होतं.
त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी उद्या सभागृहामध्ये मराठ्यांना 'ओबीसी'मधून आरक्षण द्याव की नाही? फक्त एवढेच सांगावं मग आमच्या मनातील संभ्रम दूर होईल असं म्हणत त्यांनी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर पलटवार केला.
माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले, बैठकीला न आल्यामुळे महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आला आरक्षणा संदर्भातील बैठकीला उपस्थित राहायच नाही दोन्ही समाजात मात्र भांडण लावायची असं महाविकास आघाडीचे काम असल्याचं सावंत म्हणाले तसेच
दुपारी चार पर्यंत ते बैठकीला येणार होते. मात्र त्यांना कोणीतरी बैठकीला जाऊ नका असा आदेश दिल्यामुळे विरोधक बैठकीला आले नाहीत असा गंभीर आरोप देखील उदय सामंत यांनी केला.
विरोधी पक्षनेतेने फक्त एवढं सांगावं की मराठ्यांना 'ओबीसी'मधून (OBC Reservation) आरक्षण द्यायचं का त्यांचा 'ओबीसी'मध्ये समावेश करायचा का याबाबत उद्या वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलावं असं आवाहन देखील सामंत यांनी यावेळी केलं.