Vijay Wadettiwar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar : जनावरांना हिरवा चारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर वडेट्टीवारांचा निशाणा; 'राज्यात दोन चित्र...'

Maharashtra Drought : आचारसंहितेचे कारण दाखवून सत्ताधारी स्वतःच्या बेजबाबदार कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत. तेथे त्यांनी आपल्या शेतात फेरफटका मारत काही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या जनावरांना हिरवा चाराही खाऊ घातला. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी एकीकडे हिरवा चारा तर दुसरीकडे जनावरांना सुका चाराही मिळत नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांचे लक्ष राज्यातील दुष्काळाकडे वेधण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या व्यापातून मोकळे झाल्यानंतर अनेक नेतेमंडळी परदेशात फिरण्यासाठी जातात. मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र आपल्या गावातील शेतीत रमल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी शेतातील काही कामे करत जनावरांचीही देखभाल केली. त्यांनी जनावरांना हिरवा चारा खाऊ घालत असल्याचे फोटो व्हायरल झाले. याला अनुसरून वडेट्टीवारांनी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांचा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.

वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील ही दोन वेगळी चित्र आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गुरांना हिरवागार चारा आणि दुसरीकडे मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या गुरांना सुका चाराही मिळत नाही. गुरांचा चारा आणि पाण्याची सोय करण्यासाठी शेतकरी कुटुंबांना सोने गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या स्थितीकडे मात्र महायुती सरकार ढुंकूनही पाहण्यास तयार नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे देशभर आचारसंहिता आहे. लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. या निकालानंतरच आचारसंहिता शिथिल होणार आहे. यामुळे आता कामे करण्यास अडथळे येत असल्याचे कारण सरकारच्या वतीने दिले जाते. याबाबत वडेट्टीवार म्हणाले, आचारसंहितेचे कारण दाखवून सत्ताधारी स्वतःच्या बेजबाबदार कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत. महायुती सरकारच्या या वेळकाढूपणाकडे राज्यातील नागरिक पाहत आहेत, असेही ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT