मुंबई : भाजपने (BJP) विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नाराजी उघड केली आहे. यानंतर मेटे यांनी थेट सागर बंगला गाठत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत.
मेटे यांच्या सोबत शिवसंग्राम पक्ष पुरस्कृत आमदार भरतीताई लव्हेकर आणि भीमराव केराम ही उपस्थित आहेत. मेटे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहेत. या आधी माध्यमांशी बोलताना मेटे म्हणाले होते, आम्ही प्रामाणिकपणे भाजपच्या सोबत आहोत, असे असताना आम्हाला शब्द देऊन सुद्धा उमेदवारी दिली नाही. विधान परिषदेवर तुम्हाला आम्ही शंभर टक्के उमेदवारी देणार असे सांगितले होते.
भाजपने फक्त शिवसंग्रामवरच अन्याय केला. तिकीट वाटप, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि विधान परिषदेला आम्हला डावले. आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर विश्वास ठेऊन काम केले. मात्र, आजची नावे पाहता आम्हला धक्का बसला आहे, असे मेटे म्हणाले.
शिवसंग्रामच्या दोन आमदारांना घेऊन फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेणार असल्याचे मेटे यांनी सांगितले होते. भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीच्या आधी आम्ही त्यांना भेटणार आहोत. त्यांची असे का केले याची माहीत घेऊन आम्ही भूमिका स्पष्ट करु असेही मेटे यांनी सांगितले. भाजपने ठरवावे मित्र पक्षांना सोबत ठेवायचे की नाही. राज्यसभेसाठी एक एक आमदार महत्त्वाचे असताना आमचे दोन आमदार आहेत. हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे. फडणवीस आणि पाटील यांच्या भेटीनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना संधी दिली. तर, विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना डावलले आहे. त्यानंतर विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.