Mp Vinayak Raut Sarkarnama
मुंबई

'शिंदे-फडणवीसांच्या शुभेच्छांची आम्हाला गरज नाही!'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना त्यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना किंमत देत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदेगट-शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विनायक राऊत म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेशमधूनही शेकडो शिवसैनिकांनी 'मातोश्री'वर येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या पाठिशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत, असे विनायक राऊत म्हणाले. तसेच शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. पक्षप्रमुख त्यांनी म्हटलेच पाहिजे, अशी आमची अपेक्षाही नाही. त्यांची जागा नेमकी काय आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनाच्या शुभेच्छा देत ट्वीट केले. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मात्र, पक्षप्रमुख पदाचा उल्लेख टाळला. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी मी शिंदे यांच्या शुभेच्छांवर काहीही बोलू शकत नाही, असे मत व्यक्त केले.

राहुल शेवाळे म्हणाले, सामनात आमच्या जाहिराती नाकारताना कारणे सांगण्यात आली नाही. सामनाच्या कर्मचाऱ्यांनी या जाहिराती नाकारल्या आहेत. दरवर्षी सर्व खासदारांच्या सामनात जाहिराती येतात. त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिराती पाठवल्या होत्या. मात्र, त्या नाकारण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT