Girija Raut Allegations : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा नगरसेवक मुलगा गितेश राऊतांसह कुटुंबीयांवर सून गिरीजा राऊत यांनी खळबळजक आरोप केले आहेत. राऊत कुटुंबियांकडून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. त्यांना घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिलं जायचं, शिवाय त्यांच्या डोक्यावरील केस कापल्याचा धक्कादायक आरोप गिरीजा यांनी केला आहे.
गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता सुनेच्या आरोपांवर विनायक राऊत यांनी आपली बाजू देखील मांडली आहे. यावेळी त्यांनी सुनेने केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत सुनेबाबतच अनेक धक्कादायक दावे कले आहेत.
विनायक राऊत म्हणाले, "माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे आहेत. गितेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर मागील ३ वर्षांपासून त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. तक्रारीत २०१८-२२ पर्यंत अघोरी कृत्य केली जात होती, असं लिहिलं आहे. या अघोरी कृत्यावेळी तिचे आई-वडील तिच्याबरोबर होते. मग त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही? त्यांना कोणी अडवलं होतं? असे सवाल उपस्थित करत २०२२ मध्ये झालेल्या अन्यायाची तक्रार २०२६ साली करतायत यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
तसंच यावेळी त्यांनी आपल्या सुनेने मागील महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यावेळी आमच्या आणि तिच्या वकिलांनी तडजोड करण्यासाठी काही बैठका झाल्या. पहिल्याच बैठकीत त्यांनी ५ कोटी आणि ३ बीएचके फ्लॅट मागितल्याचा मोठा दावा केला आहे. यासह गिरीजा राऊत यांनी ऑटोमॅटिक गाडीही मागितली यासह दरमहा २ लाख रुपये खर्चाला मागितले होते. मात्र, आम्ही या मागण्या मान्य केल्या नसल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं.
या प्रकरणी आम्हीही न्यायालयात गेलो असून आम्ही २३ जुलै रोजी न्यायालयातच उत्तर देऊ," असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर विनायक राऊतांच्या आरोप गिरीजा राऊत फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, "मी ७ वर्षे तिथं होते. त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे माझ्याकडे अनेक संधी होत्या. पण माझ्या अपेक्षा केवळ माझ्या नवऱ्याबरोबर सुखी संसार आणि माझ्या कुटुंबाबरोबर आनंदाने नांदणं या होत्या. पण त्यांनी ते मला दिलं नाही. उलट सतत माझा छळ केला."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.