Vinod Tawde Sarkarnama
मुंबई

Vinod Tawde News: विनोद तावडेंचं लोकसभेला ४० जागा जिंकण्याचं मतांचं गणित काय आहे?

Loksabha Election : ४० जागा कशा जिंकणार? पाहा तावडेंचं मतांचं गणित!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणापासून जवळपास चार वर्षे दूर राहिलेले भाजपचे नेते, विनोद तावडे (Vinod Tawde) राज्यारपासून दूर झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात कार्यरत झाले. भाजरपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर त्यांची नियुक्ती झाली. नुकतीच त्यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप ४० जागा कशा जिंकणार आहे, त्याचे गणित सांगितले.

विनोद तावडे म्हणाले,"महाविकास आघाडीला नक्कीच कापता येऊ शकतं. मला वाटतं की, मुळात सर्व्हे आता होतो ते, राज्यातल्या राजकीय घडामोडींवर होत असतो. २०१४ ची विधानसभा निवडणुका पाहिली तर भाजप वेगळा लढला, शिवसेना वेगळी लढली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली. त्यावेळी भाजपला २९ ट्क्के मते होती, शिवसेनेला १९ टक्के मते होती. काँग्रेसला १८ आणि राष्ट्रवादीला १७ ट्क्के मते होती. आता ही टक्केवारी पाहिली होती. शिवसेनेच्या १९ टक्के मतांमध्ये ९ ते १० टक्के मते ही हिदुत्त्ववादी मते आहेत."

तावडे पुढे म्हणाले, "शिवसेना ज्या पद्धतीने राम मंदीराला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत गेली. हिंदु्त्त्वाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली. त्यामुळे शिवसेनेची १० टक्के मते हिंदुत्वामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे होती, ती शिवसेनेपासून वेगळी होऊ शकतात. आणि ती व्हायला लागलेली आहे. ती मते जर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मिळवता आली, तर एकदम लोकसभेच्या २९ जागांवरून भाजप ३९ जागांपर्यंत जाते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरिब कल्याण कार्यक्रम आहे, यामुळे ४ ते ५ टक्के गरिबांची मते नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळायची ती भाजपकडे आली, तर भाजप एकदम ४४ ते ४५ टक्के मतांपर्यंत जातो. त्यामुळे मला वाटतं की, लोकसभेला एक वेगळं चित्र दिसेल."

"आगामी लोकसभा निवडणुकीत जर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यापैकी निवड असेल तर स्वाभाविकपणे, ग्राऊंडचा बेस आणि नेतृत्तावाचा फेस, यावर भाजप लोकसभा निवडणुका जिंकू शकतो, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT