Dhananjay Munde News Updates, Dhanajay munde admited in Breach Candy News
Dhananjay Munde News Updates, Dhanajay munde admited in Breach Candy News  sarkarnama
मुंबई

धनंजय मुंडेंसाठी सर्वच नेत्यांची लगबग : आराम करण्याचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज ता. (१३) बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह ठाकरे सरकारमधील डझनभर मंत्र्यांनी रुग्णाल्यामध्ये जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही फोन करुन मुंडेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही मुंडे यांची भेट घेऊन आराम करण्याचा सल्ला दिला. मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात मंगळवारी रात्रीपासून उपचार सुरु आहेत. सततच्या प्रवासामुळे मुंडेंना भोवळ आल्याचे डॉक्टरांनी तपासण्यानंतर सांगितले.

त्यांची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी बुधवारीच स्पष्ट केले होते. मुंडे हे उपचारासाठी दाखल होताच, आरोग्य मंत्री राजेश टोपे रुग्णालयात भेटीसाठी गेले होते. त्यानंतर सकाळी अजित पवार यांनी रुग्णाल्यामध्ये मुंडे आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर ठाकरे, फडणवीस यांनी फोन करून विचारपूस केली. तर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार प्रीतम मुंडे, राज्याचे अन्नव नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र याड्रावकर, विश्वजीत कदम, अब्दुल सत्तार, यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार संजय दौंड, भाजप नेते आशिष शेलार, किरण सरनाईक, बाळासाहेब आजबे, विनायक मेटे, विक्रम काळे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या आमदारांनी मुंडे यांची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली.

मुंडे हे सोमवारी जनता दरबारला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, मुंडे यांना भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धावपळीमुळेच मुंडे यांना त्रास झाल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT