Andheri By Election |Chandrashekhar Bavankule| 
मुंबई

उद्धव ठाकरेंना मतदान म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान

Andheri By Election |उद्धव ठाकरेंची मशाल अरबी समुद्रातं पाणी आणून विझवणार

अनुराधा धावडे

Chandrashekhar Bavankule| मुंबई : उद्धव ठाकरे यांना मतदान करणे म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणे. त्यामुळे आगामी निवडणूकीत मराठी माणसांनी, हिंदूंत्ववादी लोकांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला मतदान करु नये म्हणून आमचे भाजप युवा मोर्च्याचे प्रतिनीधी प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन जागृती करणार, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षपदी राहुल बबनराव लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी निशाणा साधला. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या आगामी निवडणुकीचे लक्ष्यही सांगितले.

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीला सामोरे जात आहोत. यात आम्ही बारामतीतलं घड्याळ बंद पाडणार तर साकोलीत पंजालाही थांबवणार. तर, उद्धव ठाकरेंना जे मशाल हे चिन्ह मिळालं आहे ती मशाल अरबी समुद्रातं पाणी आणून विझवणार, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आता बाळासाहेबांच्या विचारांच्या पलीकडे गेले आहेत. त्यामुळे आता वरळी, बारामती आणि साकोली ही आमची तीन टार्गेट असणार आहेत.

आम्ही जनतेत जाणार, अडीच कॉंग्रेसने वारंवार वीर सावरकरांचा वारंवार अपमान केला. त्याला ठाकरेंनी साथ दिली, कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला साथ दिली. पण आता तुम्ही सहानुभूतीच्या नावावर मते मागू शकत नाही, तुम्ही केलेल्या कृतीवर आम्ही बोलणार आहे. तुमचंं कर्तृत्व आणि कामाच्या आधारावर मतदान होणार आहे. आता अंधेरीच्या पोटनिवडणूकीत आम्ही जनतेत जाऊन उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे कॉंग्रेस राष्ट्रवादीला मतं देण, हिंदूत्त्वाच्या विरोधात मतदान करणे, ही भूमिका आम्ही जनतेपर्यंत पोहचवू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT