Vijay Wadettiwar, Eknath Shinde and Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Wadettiwar On CM, DCM: एक ‘भाई’ तर दुसरा ‘दादा’, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा !

Eknath Shinde News: पुणे आणि नागपूरमध्ये ठाणे गायब झाले.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News : ‘तिन्ही इंजीन एकमेकांना धक्के मारत आहेत’, असे ट्विट आज (ता. ३०) करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर दुपारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधले. पुणे आणि नागपूरमध्ये ठाणे गायब झाले, अशी घणाघाती टिका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

आमदार विजय वडेट्टीवार जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले, तेव्हापासून ते दररोज काही ना काही मुद्द्य़ांवरून राज्य सरकारवर हल्ला चढवत असतात. आज सकाळी त्यांनी ट्विट करून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ट्रिपल इंजीन सरकारमधील इंजीनं आता एकमेकांना धक्के मारत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नसले तरी, त्यांच्या देहबोलीतून सर्वकाही लक्षात येते आहे. त्यानंतर दुपारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.

शिंदेंवर टिका करताना वडेट्टीवार म्हणाले, हे सरकार जनहितासाठी नाही, तर मारामाऱ्या करण्यासाठी आणि त्यांचे खास माणसे पोसण्यासाठी आहे. सरकारमधील एक मोठ्या पक्षाच्या मर्जीतले मुख्यमंत्री आहेत. चुटकी वाजवली की मुख्यमंत्री चालतात, चुटकी वाजवली की वळतात. मुख्यमंत्र्यांना स्वतःची विचारधारा नाही. ते दुसऱ्याच्या भरवशावर सरकार चालवत आहे. त्यामुळे मुंबईची (Mumbai) वाट लागणे आता निश्‍चित आहे.

सरकारमध्ये एक ‘भाई’ तर दुसरा ‘दादा’ आहे आणि दोघेही ‘टेरर’ आहेत. त्यामुळे आता जनतेचे काही खरे नाही. या सरकारमध्ये (State Government) काय सुरू आहे, हे जनतेला चांगले कळून चुकले आहे. सत्ताधाऱ्यांचा समाचार पुढील काळात जनता घेणारच आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या राज्यासाठी, जनतेसाठी तरी काही गोष्टी स्वतःच्या मनाने कराव्या. केवळ इशाऱ्यांवर त्यांनी काम करू नये, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT