Dilip Walse patil, Dhananjay Mundhe sarkarnama
मुंबई

वळसे पाटील, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे गोव्यात स्टार प्रचारक...

या स्टार प्रचारकांची star campaigner यादी दिल्ली Delhi Office कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली S. R. Koholi यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आज राष्ट्रवादीने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा समावेश केलेला आहे.

या स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन आदी प्रमुखांचा समावेश आहे.

या यादीमध्ये राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT