Sameer Waankhede  Sarkarnama
मुंबई

जातप्रमाणपत्रामुळे वानखेडेंची नोकरीही धोक्यात?

खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा मलिकांचा आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Drugs case) मुख्य साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. साईल यांनी थेट एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप केल्यामुळे आता वानखेडेंच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच आज पुन्हा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे समीर वानखेडे यांच्या नोकरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

खोट्या जातप्रमाणपत्राच्या (Birth Certificate) आधारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. याबाबत बोलताना त्यांनी वानखेडेंचा जन्मदाखल्याचा संदर्भ दिला आहे. " मी काल ट्विटरवर शेअर केलेला समीर वानखेडे यांचा जन्मदाखला खरा आहे. वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद असं आहे. मुंबईमध्ये जन्माचे दाखले ऑनलाइन पद्धतीने सहज मिळतात. वानखेडेंच्या बहिणीचा जन्मदाखला ऑनलाइन उपलब्ध आहे. पण वानखेडे यांचा जन्मदाखला मिळाला नाही. दीड महिने शोध घेतल्यानंतर आम्हाला वानखेडेंच्या जन्माचा दाखला मिळाला.''

यातून असे सिद्ध होते की, ज्ञानेश्वर वानखेडे जन्मानं दलित होते. वाशिममधून त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र मिळवलं आणि त्याआधारे नोकरी केली. त्यानंतर झायदा खान यांच्यासोबत लग्न केल्यानंतर ते दाऊद खान बनले. संपूर्ण कुटुंब मुस्लिम धर्माप्रमाणे जगलं. दोन मुलांचा जन्म झाला त्यांचं संगोपनही मुस्लिम धर्माप्रमाणे झालं. त्यानंतर, समीर वानखेडे यांनीदेखील वडीलांच्या कागदपत्राच्या आधारावर स्वत:ची कागदपत्रे तयार केली. खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून घेतला. असे गंभीर आरोप मलिकांनी केले आहे.

मी या विविध दलित संघटनासह वानखडेंचे हे खोटे प्रमाणपत्र जातवैधता समितीसमोर सादर करणार आहेत. वानखेडे यांच्या विरोधात तक्रार करणार आहेत. सत्य लोकांसमोर येईल,' असेही त्यांंनी म्हटले आहे. पण, मी जाहीर केलेला वानखेडेंचा जन्मदाखला खोटा असल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगित आहे. जर तो जन्मदाखला खोटा असेल तर खरा दाखला वानखेडेंनी प्रसिद्ध करावा. समीर वानखेडे यांनी आपलं जातप्रमाणपत्र प्रसिद्ध करावं. तुम्ही ते स्वत: ते करत नसाल तर आम्ही जन्मदाखल्याप्रमाणे जातीचा दाखलाही शोधू शकतो. असा इशाराही मलिकांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT