Uddhav and Aditya Thackeray
Uddhav and Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

शिवसेनेतील फुटीला आम्हीच जबाबदार..! आदित्य ठाकरेंनी स्वत: कबुली दिली

सरकारनामा ब्युरो

Aditya Thackeray news| मुंबई : शिवसेनेत जी फूट पडली या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thacekray) यांनी केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.

"राजकारण हे फार घाणेरडे ठिकाण नाही, किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी चिखलात जावे लागत नाही, असे आम्हाला वाटत होते. पण ती आमची चूक होती. असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. मध्यावधीसाठी भाजपला दोष देणार का, असा सवाल त्यांनी केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासारखे घाणेरडे राजकारण करत नाही.

गेल्या ४० ते ५० वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे असलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना दिलं होतं. सत्तेत असताना कधी विरोधी पक्षनेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. पण आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक झाली, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. भाजप आणि शिवसेना यांच्याच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती केली. पण भाजपने त्यांचा शब्द पाळला नाही. असे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

एकनाथ शिंदे गट अद्याप मान्यताप्राप्त पक्ष नाही. शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे नुकसान करण्याचा त्यांचा एकच हेतू होता. देशभरात अनेक बाळासाहेब आहेत. माझ्यासाठी, संकट आहे की नाही, हा आता प्रश्न नाही. कारण आम्ही ही लढत आहोत. आमच्या पक्षातील 40 गद्दारांना घेऊन ते पळून गेले आहेत. आपल्या संविधानाच्या आदर्शांचे काय होते, लोकशाहीचे, कायद्याचे राज्य आणि न्यायाचे काय होते हे आज माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT