Nawab Malik News Updates 
मुंबई

`भाजप नेत्यांचे कोणत्या अभिनेत्रींशी संबंध, याचा स्फोट करायला लावू नका`

Disha Salian| Nawab Malik दिशाच्या आई वसंती सॅलियन आणि वडील सतिश सॅलियन यांनी आपल्या मुलीची बदनामी न करण्याची विनंतीही केली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एखादया महिलेचा मृत्यू झाल्यावरही तिला काही मंडळी बदनामी करण्याचं काम करत आहेत. असं घाणेरडे राजकारण भाजपच्या लोकांकडून सुरू आहे. हत्येबाबत राणे कुटुंबीय जे बोलत आहेत तो त्यांचा तो अनुभव आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्रीचे कुणाशी संबंध आहेत हे आम्हाला उघड करायला लावू नये नाही तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप आणि राणे पिता पुत्रांना खडसावलं आहे.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushantsingh Rajput) याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात पत्राद्वारे थेट महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आज किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सॅलियनच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दिशाच्या आई वसंती सॅलियन आणि वडील सतिश सॅलियन यांनी आपल्या मुलीची बदनामी न करण्याची विनंतीही केली.

आमच्या मुलीची बदनामी करु नका

'दोन वर्षे झाली या प्रकरणाला ही केस बंद झाली आहे. तरीही आम्हाला त्रास दिला जात आहे. आम्ही दररोज मरतोय, खूप त्रास दिला जातोय या आरोपांमुळे आम्हाला ही जगण्यात अर्थ राहिला नाही. या पुढे आम्ही जरका काही बरवाईट करून घेतलं त्याला हे जबाबदार असतील, राणेंना विनती आहे माझी एकुलती एक मुलीला मी गमावलं आहे. माझी मनस्थिती समजून घ्या, अशी विनंती करताना दिशा सॅलियनची आईला अश्रु अनावर झाले होते.तसेच, जर आम्हाला अशाच प्रकारे बदनाम केलं तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू याला जबाबदार हे असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कॉंग्रेसशिवाय दूसरा पर्याय नाही

दरम्यान, नबाव मलिक यांनी देशात सुरु असलेल्या परिस्थितीवरही भाष्य करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशात एक पर्याय उभा राहिला पाहिजे.काँग्रेस शिवाय हा पर्याय नसणार,याबाबत चर्चा सुरू आहे. २०२४ आधी हा पर्याय तयार होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा आहे, पण जोपर्यंत ते भाजप सोडत नाही तोपर्यंत चर्चा नाही, इतकेच नव्हे तर देशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकांनंतर पाचही राज्यात भाजपची सत्ता येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

धर्माचे राजकारण करणाऱ्याला जनतेने सत्तेतून बाहेर फेकले

भाजपने १९९३मध्ये धर्माचे राजकारण सुरु केले तेव्हाही जनतेने भाजपला सत्तेतून बाहेर केले. पाच वर्षात हेच झालं, युपीमध्ये भाजपच्या १५० हून कमी जागा येतील. त्यातून राष्ट्रपती निवडणूक सोपी नाही, यावर सगळे राजकीय पक्ष भेटतील, चर्चा होईल. अजून कोणाच्याही नावावर चर्चा नाही, पण पाच राज्यांच्या निवडणूकांनंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत चर्चा होईल, जर नितीश बाबू इच्छा असेल तर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT