Supriya Sule on Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

Supriya Sule on Devendra Fadanvis: शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात काय दिलं..; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Maharashtra Politics: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आज (३० जून) एक वर्ष पूर्ण झालं

सरकारनामा ब्यूरो

Supriya Sule Criticized on Shinde-Fadanvis Government : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं. पण सरकार स्थापनेच्या एक वर्षांनंतर काय मिळालं,कांद्याला भाव मिळाला का, महागाई कमी झाली का, शेतकऱ्याचा पदरात काय पडलं, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव मिळाला का, असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजपकडून वारंवार होणाऱ्या टिकेवर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, जो पर्यंत शरद पवार यांच्यावर टिका करत नाही, तोपर्यंत बातमी होतं, हे गेली ५५ वर्षे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीत इतके अडकले आहेत, कारण त्यांना मुळे मुद्द्यांवर बोलायचंच नाहीये. ते महागाईवर का बोलत नाही, सिलेंडवर का बोलत नाहीत. महिला सुरक्षेवर का बोलत नाहीत, या मुलभूत गोष्टींवर का भाष्य करत नाही, म्हणून ते दुसऱ्याच गोष्टींवर बोलत बसतात. ज्याला आज काही महत्त्वचं नाही. प्रशासन सोडून मागे जाणं, गॉसिप्स करणं, यातचं हे सरकार मग्न आहे, एकतर यांनी सरकार ओरबाडून आणलंय त्यातही हे सरकार प्रशासन सोडून बाकी सर्व काही करत आहे.

केंद्रात आणि राज्यात याचचं सरकार आहे. पण यांच्याकडे पुढे आपण काय करणार, सिलेंडरचे भाव कमी कसे करणार, महागाई कशी कमी करणार, गेलेल्या नोकऱ्या परत कशा आणणार, याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. काहीच नाही मिळाल तर पहाटेचा शपथविधी. म्हणून मी अजित दादांना अमिताभ बच्चन यांची उपमा दिली होती. भाजपला (BJP) शरद पवार आणि अजित पवार यांच्यापुढे काही दिसतच नाही. महाराष्ट्राचं राजकारण जर माझे वडिल आणि माझा भाऊ आणि आमच्या नेत्यांशिवाय चालत नसेल तर, या पेक्षा मोठी कॉम्लिमेंट राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलीच नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT