Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : राज्यात लवकरच आचारसंहिता; मग मंत्रिमंडळ विस्ताराचा काय फायदा; बच्चू कडूंची नाराजी कमी होईना

दिल्ली दौऱ्याच्या वेळी त्या त्राग्यातून आपण मंत्रिपदावरील दावा सोडत आहोत, असे जाहीर केले होते.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यात थोड्याच दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केवळ पाच ते सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करून काय फायदा, असा सवाल माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. (What is benefit of extending the cabinet for five to seven months; bacchu kadu)

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्च कडू (Bacchu Kadu) हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झाले होते. आपल्याला मंत्रिपदाचा शब्द दिलेला आहे, असा दावा आमदार कडू यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion ) होत नसल्याने त्यांनी अनेकदा थेट सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आमदार कडू म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करून आता कोणताही फायदा होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केवळ सहा-सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करून काहीही फायदा होणार नाही.

वास्तविक गेल्या सरकारमध्ये मंत्री असल्याने बच्चू कडू यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळाचा दोन वेळा विस्तार होऊनही त्यात कडू यांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्यांनी आपला राग अनेकदा बोलून दाखवला आहे. दिल्ली दौऱ्याच्या वेळी त्या त्राग्यातून आपण मंत्रिपदावरील दावा सोडत आहोत, असे जाहीर केले होते.

शिंदे सरकारला खोके सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे यांचाही बच्चू कडू यांनी समाचार घेतला. आम्हाला खोके सरकार म्हणण्याचा आधिकार उद्धव टाकरे यांना केाणी दिली. मुंबई महापालिकेत अनेक वर्षे तुमचीच सत्ता होती आणि तिथे त्यांनी काय केलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कामाला लोकांची पसंती मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडे आणखी काही आमदार येतील, असा विश्वासही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT