Shivsena| BJP 
मुंबई

BJP Politics|वेदांतासाठी किती टक्केवारी मागितली होती? शेलारांचे शिवसेनेवर गंभीर आरोप

BJP Politics| महाराष्ट्रात येणारा हा फॉक्सकॉन-वेदांताचा हा प्रकल्प मोठा होता

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प अचानक राज्याच्या हातून निसटला आणि गुजरातला गेला. यावरुन आता सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. असे असताना आता भाजपाचे (BJP) मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप करत शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर हे आरोप केले आहेत.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केला! असं त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर, वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे... जनतेसमोर सत्य यायलाच हवे!!'' असे गंभीर आरोप आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केले आहेत.

महाराष्ट्रात येणारा हा फॉक्सकॉन-वेदांताचा हा प्रकल्प मोठा होता. या प्रकल्पांत सुमारे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार होते, पण महाराष्ट्राच्या हातून हा प्रकल्प निसटून गुजराच राज्यभरात एकच गोंधळ माजला आहे. त्यात आता आशिष शेलारांच्याआरोपांमुळे हे प्रकरण आणखी चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तर दूसरीकडे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकल्पावरुन निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत विचारले असताना अजित पवार म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांकडून होणारे धादांत खोटे आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन तीन महिने झाले. कंपनीने ट्वीट केल्यानंतर ही बाबत उघडकीस आली. कितीतरी दिवस ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळीच हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठ प्रयत्न करायला हवे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT