Anil Parab News
Anil Parab News  
मुंबई

Maharashtra Political Crises : पक्षप्रमुख पदाचं काय होणार? अनिल परबांनी दिलं उत्तर

सरकारनामा ब्युरो

Anil Parab News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या पदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. तर निवडणूक आयोगाने 30 जानेवारीला यासंदर्भात सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार कायम आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाच काय होणार, हे अद्याप स्पष्ट नसताना शिवसेना नेते अनिल परब यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. ''निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली सुनावणी ही औपचारिकता असून निकाल काहीही लागला तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख असतील, असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे. तसेच, मुदत संपणं हा एक तांत्रिक मुद्दा असून आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाही, असंही त्यांनी नमुद केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्यास आता अवघे काही तास शिल्लक असून निवडणूक आयोगाने त्यांचं पक्ष प्रमुखपद वाढवण्यास मुदतवाढ किंवा निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाच काय होणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख पदी कायम राहतील, मुदत वगैरे काही नाही, पक्षातंर्गत बैठकीत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Shivsena) राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादावर निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांना तात्पुरते नवे चिन्ह आणि पक्षाला नाव देत अंधेरी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम पार पाडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT