eknath shinde, Rohit Pawar
eknath shinde, Rohit Pawar  sarkarnama
मुंबई

Shinde Government : मंत्रालयात फायलींचे ढिग साठले ; संभाव्य मंत्र्यांच्या क्षमतेबाबतही शंका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला, भाजपमध्ये मंत्र्यांच्या यादीवरून असलेली असहमती आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी या सर्व पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तार कधी होणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे. (Rohit Pawar latest news)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने विस्ताराबाबतच्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिंदे सरकारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी टि्वट करुन सरकारवर निशाणा साधला आहे.

"लोकशाही व्यवस्थेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी राज्य चालवत असतात. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण साहेब यांनी सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय केलं. पण ३७ दिवसांपासून आज तेच मंत्रालय मंत्र्यांविना ठप्प झालं असून फायलींचे ढिग साठले आणि लोकांची कामं खोळंबलीत," असं टि्वट पवार यांनी केलं आहे.

"तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करुन कामकाजाला गती देण्याऐवजी राज्य सरकारने मंत्र्यांचे अधिकार पुन्हा सचिवांना देणं म्हणजे संभाव्य मंत्र्यांच्या क्षमतेबाबतही शंका घेण्यासारखं आहे," असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोघांचेच मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे. दोघांच्या मंत्रीमंडळावर चौफेर टीका होत आहे. शिंदे गट आणि भाजपला मंत्रीमंडळ विस्तार मार्गी लावणे शक्य झालेले नाही. आज ३७ दिवस उलटूनही मंत्रीमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांची अडचण झाली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची यादी तयार असली, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम करणार असल्याने विस्ताराचे गाडे अद्याप अडल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT