Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी आज (19 जानेवारी) मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईत हजारो कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. त्यामध्ये मुंबई मेट्रो, मुंबईतील रस्ते, महानगपालिकेचे दवाखाने, तसेच पंतप्रधान स्वनिधीच्या कामांसह हजारो कोटींच्या विकास कामाचे उद्घाटन झाले.
एकीकडे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत हजारो कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन होत होते. तर याचवेळी दुसरीकडे 'मातोश्री'वर आज दिवसभर विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे सत्र सुरू होते. या बैठकींच्या सत्राचे कारण म्हणजे उद्या (ता.20 जानेवारी) निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची? याबाबत महत्वाची सुनावणी पार पडणार आहे.
निवडणूक आयोग (Central Election Commission) उद्या काय निर्णय देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवरच उद्याचा दिवस महत्वाचा मानला जात असल्यामुळे आज दिवसभर उद्धव ठाकरे हे आपल्या मुख्य नेत्यांसोबत चर्चा करत होते.
तसेच आदित्य ठाकरेही आपल्या पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना भेटण्यात व्यस्त होते. उद्याच्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्य नेत्यांसोबत चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.
तसेच आजच पुण्यातील शिवसैनिकांनी (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना 'बाळासाहेब ठाकरे कबड्डी चषक स्पर्धे'चे निमंत्रण दिले आहे. तर आज 'मातोश्री'वर येऊन मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान मोदी हे मुंबईत हजारो कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन करत होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दिवसभर बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.