lodha
lodha 
मुंबई

भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत कोठे? 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे माजी मंत्री ऍड. आशिष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधकांवर तुटून पडलेले असताना मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा कोठेच दिसत नाहीत. त्यामुळे हे मुंबई अध्यक्ष आहेत कोठे असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

तान्हाजी हा सिनेमा करमुक्त करा ही मागणी लोढा यांनी केली आहे. त्यापुर्वी गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात फ्रि काश्‍मिरच्या बॅनर विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनात ते दिसले होते. मात्र फ्रि काश्‍मिरचा मुद्दा किरीट सोमय्या यांनी चर्चेत आणला होता. त्यांनीच पाठपुरावा केल्यानंतर त्या मुलीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहीणाऱ्या व्यक्तीचे शिवसैनिकांनी मुंडन केले होते. त्या वादातही सोमय्या यांनी पुढाकार घेऊन संबंधीत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करुन घेतला होता. तर, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगाराला केलेल्या मारहाणीचा मुद्दाही सोमय्या यांनी उचलून धरला आहे तर, सुधारीत नागरीत्व कायद्याबाबतच्या अभियानात सहभागी झालेल्या शाळेला नोटीस पाठवल्याच्या विरोधात सोमय्याही पुढे आले आहेत. तर, आमदार शेलारही प्रत्येक मुद्दयावरुन महापालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. 

ऍड. शेलार आणि सोमय्या यांनी एकाच वेळी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला आव्हान देण्यास सुरवात केली आहे. या सगळ्या परीस्थीतीत मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा कोठेही दिसत नाही. लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायिक आहेत. ते नेहमीच सत्ताधाऱ्यांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून असतात. त्यामुळेच ते पडद्याआड असल्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.  ते शिवसेनेशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT