Kishori Pedanekar|
Kishori Pedanekar| 
मुंबई

शिवसेनेचा Dasara Melava कुठे होणार? किशोरी पेडणेकरांनी स्पष्टचं सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) काहीना काही कारणावरुन ठिणग्या पडत आहेत. त्यातच आता दसरा मेळाव्यावरुनही नवा वाद सुरु झाला आहे. मुंबईतील शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात चढाओढ सुरु झाली आहे. शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की शिंदे गटाला परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरु झाले आहेत.असे असतानाच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.'दसरा मेळावा... आतूरता,' असे ट्विट करत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा पाठमोरा फोटो ट्वीट केला आहे.

याशिवाय दूसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दसरा मेळावा शिवतीर्थावरच, मी उद्धवजीं सोबत….असं दुसरं ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लहान मुलं “दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. मी उद्धवजींसोबतच”, असं म्हणताना दिसत आहेत. किशोरी पेडणेकरांच्या या ट्वीटमुळे चर्चांना चांगलचं उधाण आलं आहे.

दसरा मेळ्यावरुन यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका, असे आवाहन करत किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. एकीकडे दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे नाव वापरायचे, भाजपची मदत घ्यायची. पण हा त्यांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एक पक्ष, एक झेंडा, एक नेता, एक मैदान ही परंपरा निर्माण केली होती, उद्धव ठाकरे यांनी ती परंपरा पुढे चालवली. पण आता दररोज राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या जात आहेत. पण शिवसेना कुणाची हा निर्णय न्यायालयातच होईल, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT