Sanjay Raut, Mohit Kambij, Atul Londhe Sarkarnama
मुंबई

BJP Leader Threats Police : फडणवीसांच्या नावाने पोलिसांना धमकावणारा भाजपचा नेता कोण? राऊत, लोढेंच्या ट्विटमुळं राज्यात खळबळ

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राज्यात कायदा व सुवस्थेचे धिंडवडे उडत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आरोप केला आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सतत बोलत असतात. आता राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात एका डान्सबारमध्ये भाजपचा एक नेता पहाटेपर्यंत धिंगाणा घालत असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले आहे. दरम्यान, राऊत आणि लोंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी व्हिडिओमध्ये एक व्हीडिओ शेअर करुन तो एक भाजप नेता असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये सदरील व्हिडिओ पहाटे साडेतीन वाजताचा असल्याचं सांगून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "पहाटे 3.30. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवटपर्यंत पहा. पोलीस हतबल आहेत. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलीस आयुक्तांना पाठवत आहे. मी वाट पाहतोय आता पोलीस काय कारवाई करणार. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे."

अतुल लोंढे म्हणाले, "फडणवीसजी आपले लाडके बँक बुडवे रात्री तीन वाजता डान्स बारमध्ये असतात. त्यांच्यासाठी पहाटेपर्यंत डान्स बार चालू ठेवण्याची सूट आपण पोलिसांना दिली आहे का? महाराष्ट्रात नेमके कुणाचे राज्य आहे? कायद्याचे की बँक बुडव्यांचे आणि डान्सबारवाल्यांचे?"

हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या भाजप नेत्याचे नाव स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, "मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. हा बार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. आतील धिंगाण्यामुळे बाहेर ट्रॅफिक जाम झाले होते. याबाबत माहिती देणाऱ्यास धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मुलींच्या गराड्यात भाजपचे तरुण नेते मोहित कम्बोज मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी मोहित कम्बोज यांनी वर्दीतल्या पोलिसांशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमक्या दिल्या. त्यामुळे पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले."

या प्रकारामुळे भाजप नेत्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली. राऊत म्हणाले, "या घटनेचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त करावे. कम्बोज वारंवार फडणवीस, अमित शहा (Amit Shah) यांचा उल्लेख करून पोलिसांवर दाबव आणत होते. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. या बारमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत अंमली पदार्थाचे सेवन, विक्री सुरु होती. त्यात भाजपचे कम्बोज मद्यधुंद अवस्थेत गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. खार पश्चिमेचा बार कुणाचा आहे, त्याचा तपास करवा. पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT