मुंबई

कंगनाचा बोलवता धनी कोण; नवाब मलिकांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranout) गेल्या आठवड्यात स्वातंत्र्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्याने देशभरातून तिच्यावर टिका झाली. त्याला काही दिवस उलटत नाही तर तिने पुन्हा तिने महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. "गांधींनी भगतसिंग किंवा सुभाषचंद्र बोस यांना कधीही पाठिंबा दिला नाही... भगतसिंग यांना फाशी द्यावी अशी गांधीजींची इच्छा होती,'' असे वक्तव्य कंगनाने केले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कंगनाला फटकारले आहे.

"एक महिला महात्मा गांधीच्या विरोधात बोलते आणि तिच्या बोलण्याने गांधींचे विचार संपतील असं जर कोणाला वाटत असेल, त्यांनी गैरसमज करुन घेऊ नये. कारण महात्मा गांधी हे व्यक्ती नाही तर विचार आहेत. बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत आणि हे विचार कधीही संपणार नाही," असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अभिनेत्री कंगना राणावतला फटकारले आहे.

''नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे, अशा पध्दतीने वारंवार असे लोकं बोलत आहेत,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

''कंगना राणावतने महात्मा गांधींजींचा अपमान केला आहे. अहिंसेचा विचार जगाने स्वीकारला आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही मिळवू शकतो. मात्र कंगनाने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण, हे देशाला माहीत आहे,'' असेही नवाब मलिक म्हणाले.

''ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर तो चूक आहे,'' असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT