Nitin Gadkari Sarkarnama
मुंबई

Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

Nitin Gadkari News : धमकी देणाऱ्याने १०० कोटीं रुपयांची मागणीही केली असल्याचीही माहिती आहे.

सरकारनामा ब्युरो

Nitin Gadkari News : भाजप नेते, केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना शनिवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला होता.

पोलिस प्रशासन या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे, या डायरीत काय मजकूर आहे, त्या दिशेने पोलिसांनी तपासाची दिशा ठरणार आहे. या डायरीत काही नंबर असून आरोपीने आणखी काही लोकांना फोन केल्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

सकाळी नागपुरातील (Nagpur) खामला चौकातील कार्यालयात सकाळी ११.३० वाजता दोन कॉल आणि १२ वाजताच्या सुमारास एक कॉल करून दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने १०० कोटीं रुपयांची मागणीही केली असल्याचीही माहिती आहे.

हे प्रकरण पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकाने गांभीर्याने घेतले आहे. कर्नाटकच्या हुबळी येथून तो कॉल आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दिशेने तपास सुरू झाला आहे. गडकरी यांच्या कार्यालयात बेळगावच्या कारागृहात असलेल्या जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

बेळगाव कारागृहात संबधित आरोपी जवळ फोन कसा पोहोचला, धमकी देण्यामागे त्याचा काय हेतू होता, याचा तपास पोलिस करीत आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे.

याप्रकरणी तपासासाठी नागपूर पोलिस बेळगावात दाखल झाले आहेत.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांना आरोपीजवळ एक डायरीदेखील सापडली आहे.

नागपुरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये फोन करून कांथाने गडकरींना जिवे मारण्याची धमकी देत शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितली. कांथा हा बेळगाव मध्यवर्ती कारागृहामध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT