Mauris Narohna, Abhishek Ghosalkar  Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळीबारात मृत्यू; कोण आहेत अभिषेक घोसाळकर, मॉरिस नोरोन्हा ?

Dahisar Firing News : घोसाळकर आणि मॉरिस पूर्वीचे मित्र, वाद मिटल्यानंतर त्यांचे फेसबुक लाईव्ह सुरू होते.

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai Political News : दहिसर येथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांचे पूर्वीचे मित्र मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. यात घोसाळकरांचा मृत्यू झाला. या गोळीबारानंतर मॉरिसनेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात झालेल्या घटनेनंतर दहिसर येथील या गोळीबाराने मुंबईसह महाराष्ट्र हदरला आहे. या घटनेनंतर अभिषेक आणि मॉरिस नेमके कोण होते, त्यांच्यात काय संबंध होते याची चर्चा सुरू आहे. Abhishek Ghosalkar Shot Dead

कोण आहेत अभिषेक घोसाळकर?

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) हे चिरंजीव आहेत. वडिलांप्रमाणेच अभिषेक घोसाळकर यांनी सुरुवातीला समाजकार्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होत्या.

कोण आहे मॉरिसभाई ?

गुंड मॉरिस (Mauris Naronha) हा बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीत राहत आहे. समाजसेवक मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याच्यावर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्या आरोप असल्याचं सांगितलं जातं. या महिलेला त्याने धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे तर कोर्टात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मॉरिसभाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवल्याचं सांगितलं जातं.

फेसबुक लाईव्ह मॉरीस-अभिषेक शेजारीच बसले

या व्हिडिओत त्यांच्याबाजूला मॉरीस भाई बसला होता. यावेळी मॉरीस भाई बोलताना दिसत आहे. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. जी गोष्ट युनिटीसाठी होते. आयसी कॉलनीच्यासाठी होत आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साडी वाटायची, रेशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचं ठरवलं आहे, असं मॉरीसभाई म्हणतो.

त्यानंतर अभिषेक घोसाळकर बोलताना दिसत आहेत. आता कसं आहे की, आताच आपण सांगितलं की आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे चांगला दृष्टीकोण ठेवून आणि एकत्रित रित्या राहून एक चांगलं काम करायचं आहे. ( मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणाने पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं पाहिलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणतात.

तेवढ्यात मॉरीस भाई येतो. आणि आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उभं राहायला उठतात. तेव्हा अभिषेक उठत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच अचनाक त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या.

गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT