Modi Government Cabinet Expansion : एकीकडे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या उद्देशाने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. या मंत्रिमंडळात शिंदे गटाला दोन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाचा होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) मंत्रिमंडळात खांदेपालट केले जाण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जानेवारी पूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. 16 आणि 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक पार पडली आहे. यामध्ये देखील फेरबदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यात शिंदे गटातील काही खासदारांनाही मंत्रिपदाची लॅाटरी लागण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नेमकी शिंदे गटाला दोन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मात्र यात खासदार राहुल शेवाळे, कृपाल तुमाने यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती आहे.
आगामी काळात मुंबई महापालिका व लोकसभा निवडणुका होत असल्यानं रिझल्ट ऑरिएन्टड नेता म्हणून राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवर आहे. तसेच कृपाल तुमाने हे अनुसुचित जातीतून येतात. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अनुसुचित जातीच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कृपाल तुमाने यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर सोबत आल्यानं एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप दलित मतांसाठी सध्या मतांची जुळवा जुळव करताना पाहायला मिळत आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचेही संकेत...
शिंदे गटातील नेत्यांसह भाजपमधीलही अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 30 जानेवारीनंतर निर्णय देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.