'Mashal' Symbol Hearing गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच प्रलंबित असलेली 'मशाल' चिन्हाच्या याचिकेवर येत्या 17 जुलैला सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले.पण मशाल चिन्हावरुनही समता पक्ष आणि ठाकरे गटात मोठा वाद सुरु झाला. समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत आपल्याला हे चिन्ह मिळवण्यासाठी मागणी करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.या प्रकरणी १७ जुलैला सुनावणी होणार आहे.
सत्तासंघर्षाच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाला‘मशाल’ चिन्ह मिळाले. पण समता पक्षानेही या चिन्हावर दावा केल्याने ठाकरेंच्या अडचणीत अजूनच वाढ झाली. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी समता गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
"निवडणूक आयोगाने यापूर्वीच आम्हाला मशाल चिन्ह बहाल केले होते. १९९६ पासून मशाल हे आमचं पक्ष चिन्ह आहे. हे चिन्ह आम्हाला पुन्हा मिळावे यासाठी आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे. मशाल हे चिन्ह आमचं आहे, समता पार्टीचं आहे,"असा दावा समता पक्षाकडून करण्यात आला.
बिहारमधील राजकीय पक्ष असलेल्या समता पक्षाचे 'धगधगती मशाल'हे निवडणूक चिन्ह आहे.पण मागील काही वर्षांपासून समता पक्ष राजकारणात एकदम मागे पडला. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यामुळे निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत समता पक्षाने सर्वोच्च न्यायालायचे धाव घेतली आहे. या प्रकरणी होणाऱ्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.