Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा टक्का कसा घसरला? फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर

Devendra Fadnavis : यापूर्वी मराठ्यांना 16 टक्के आरक्षण कुणी दिलं होतं?

Avinash Chandane

Special Assembly Session for Maratha Reservation :

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानंतर विशेष विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. असं असलं तरी मराठा आरक्षणाचा टक्का कसा घसरला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आज विशेष अधिवेशन घेण्यात आले. त्यामुळे अधिवेशनाला सर्वांची उपस्थिती होती. यावेळी 10 टक्के आरक्षण देण्यात आले. शिवाय मराठा आरक्षणाचं वचनपूर्ती केल्याचं समाधान मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

तरीही आरक्षण कमी झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा टक्का घसरल्याची कबुली दिली आहे. शिवाय हा टक्का का घसरला याचं स्पष्टीकरणही दिलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना जून 2014 मध्ये मराठा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. ते कोर्टाने फेटाळून लावले. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 16 टक्के आरक्षण दिले. ते कोर्टाने कमी केले. म्हणजे शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्के केले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने (Maharashtra State Backward Class Commission) दिलेल्या निकषानुसार आरक्षणाची टक्केवारी ठरवावी लागते. आता आयोगाने सर्वेक्षण केले. त्यानुसार आताचे आरक्षण देण्यात आलेले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 2014 मध्ये दिलेले 16 टक्के मराठा आरक्षण आता 10 टक्क्यांवर आले आहे. ते कोर्टात टिकेल, असा सरकारला विश्वास आहे. एवढं मात्र खरं की 10 वर्षांत मराठा आरक्षणाचा टक्का सहा टक्के कमी झाला आहे, ही मराठा समाजासाठी चिंतेची बाब आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT