FIR On Sambhaji Bhide : Sarkarnama
मुंबई

FIR On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंविरोधात 'FIR' दाखल करण्यासाठी विलंब का? कोर्टाने पोलिसांवर ओढले कडक ताशेरे..

Sambhaji Bhide Controversial Statement : अॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत भिडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास...

सरकारनामा ब्यूरो

Panvel News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडेंविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला ? असा सवाल उपस्थित करून पनवेल सत्र न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहे. तसेच याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्ये होऊनही भिडेंविरोधात गुन्हा दाखल का करत नाही? असे म्हणत अॅड. अमित कटारनवरे यांनी याचिका दाखल केली होती.

अॅड. कटारनवरे यांच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांवर कठोर ताशेर ओढले. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरही संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेण्यास एवढा विलंब का लागला ? असा सवाल पनवेल सत्र न्यायालयाकडून नवी मुंबई पोलिसांना केला.

तसेच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत भिडे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबामागील कारणांची प्रशासकीय स्तरावर चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

संभाजी भिडे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबद्दल आक्षेपार्ह विधाने केले असल्याबाबत सोशल मीडियावरअमित कटारनवरे यांच्या निदर्शनास आले होते. यानंतर त्यांनी काही व्हिडीओ क्लिप्सचा दाखला देत कटारनवरे यांनी 28 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांत धाव घेतली होती. मात्र यावर कार्यवाही करण्यात पोलिसांकडून दिरंगाई करण्यात येत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT