Prithviraj Chavan News: Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan News: महात्मा गांधींच्या हत्येनंतर 'आरएसएस'वर बंदी का आणली?पृथ्वीराज चव्हाणांनी इतिहासच काढला

Congress- RSS Politics : धमकीचा मिळाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी आरएसएसचा इतिहासच काढला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून माजी मुख्ममंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक झाले आणि भिडेंवर कारवाईचा आग्रह धरला. त्यानंतर चव्हाणांसह राज्यभरातून भिडेंविरोधात अनेकजण रस्त्यावर उतरले. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाणांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महात्मा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य करत भाजप आणि 'आरएसएस'वर सवाल उपस्थित केले.

वाचा, काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आरएसएस सोईप्रमाने हात वर करते, पण महात्मा गांधींचा खून कोणी केला. त्याच्याशी कोणाचा संबंध आहे. महात्मा गांधींच्या खूनाच्या दुसऱ्याच दिवशी सरदार वल्लभाई पटेल यांनी 'आरएसएस'वर का बंदी आणली. त्यांचे काय विचार होते, 'आरएसएस' का बंदी घातली, याबाबतचे त्यांचे पत्र वाचले का ??...त्यामुळे आमचा संबध नाही असे म्हंटले तर कोणी विश्वास ठेवेल का?'

तसेच, मनोहर कुलकर्णीला (संभाजी भिडे) पैसे कोण देते, ती संघटना कोण चालवते, असेही त्यांनी विचारले. कायदा मोडला की नाही हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे, नाहीतर त्यांनी सांगावे की, संभाजी भिडेंनी कायदा मोडला नाही. ते संत आहेत, त्यांनी काहीच कायदा मोडला नाही असे सांगा, असही त्यांनी यावेळी नमुद केलं.

'' तेलात कोणी काडी टाकणार असेल तर गप्प बसायचे का ?हा देश पेटवायला निघाला आहे. मग आम्ही काय स्वस्त बसायचे का ? त्याने (Sambhaji Bhide) नाव का बदलले ? एखादा माणूस वेगळ्या नावाने काहीतरी करतो, एखाद्या समाजाला आक्रृष्ट करण्याकरता नाव बदलून फसवणूक सुरू आहे, हे सहन करणार नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT