Gajanan Kirtikar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Gajanan Kirtikar News : शिंदे गटातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी होणार? शिवसेनेने उचलले मोठं पाऊल

Shiv Sena : गजानन किर्तीकर यांच्यावर असलेल्या आरोपांच्या गांभीर्याने विचार शिंदे गटातील नेते करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Roshan More

Gajanan Kirtikar Vs Shivsena Shinde Group : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. मात्र, मतदानानंतर शिंदे गटात असलेले अमोल किर्तीकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांच्यावर त्यांनी अमोल किर्तीकरांना मदत केल्याचा आरोप होतो आहे. गजानन किर्तीकरांवर शिंदे गटातील नेते नाराज आहेत. शिशिर शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई करत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, म्हणून मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिले आहे.

गजानन किर्तीकर Gajanan Kirtikar यांच्यावर असलेल्या आरोपांच्या गांभीर्याने विचार शिंदे गटातील नेते करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. गजानन किर्तीकर यांच्यावर काय कारवाई होणार? शिंदे गटातून Shinde group त्यांची हकालपट्टी होणार का? याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

शिशिर शिंदेंचा आरोप

अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन किर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. तसेच गजानन किर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन किर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे केली होती.

शिंदेंना अमोल किर्तीकरांचे प्रत्युत्तर

गजानन किर्तीकरांवर आरोप करणाऱ्या शिशिर शिंदेंना अमोल किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आता पदवीधरच्या निवडणुका आहेत. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार देखील निवडले जाणार आहे. त्यामुळे प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. त्यांचा या मतदारसंघाशी काय संबंध. काही संबंध असेल तर व्हिडिओ दाखवा, असे देखील आवाहन अमोल किर्तीकर यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT