Governor bhagat singh koshyari Latest News
Governor bhagat singh koshyari Latest News Sarkarnama
मुंबई

Bhagat singh Koshyari : गुजरात निवडणुकीनंतर होणार राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी?

सरकारनामा ब्यूरो

Bhagat sing Koshyari : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यभर वातावरण तापलं आहे. त्यामुळे राज्यपाल कोशारीसंदर्भात केंद्राला निश्चितपणे एक ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, येत्या पाच डिसेंबरला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यानंतर राज्यपालांची उचलबांगडी होऊ शकते, अशी शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. (Governor bhagat singh koshyari Latest News)

19 डिसेंबरपासून राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात राज्यपालाविरोधात महाविकास आघाडी संघटितपणे जोरदार आवाज उठवणार आहे. राज्यपालांच्या निषेधाचा ठराव या अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून केंद्राकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत (Bhagat singh Koshyari) गुजरात (Gujrat) निवडणुकीनंतर तातडीने निर्णय होऊ शकतो,असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेलं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलच चर्चेचा विषय ठरलं या वक्तव्यावरून कोश्यारींचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. या विषयात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांची पुरती कुचंबणा झाली आहे. तर यावरूनच भाजपचे (BJP) खासदार आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT