Gunratna Sadavarte|
Gunratna Sadavarte| 
मुंबई

सदावर्तेंची कोठडी संपणार की पुन्हा जेल होणार? न्यायालयात आज सुनावणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची पोलिस कोठडी आज संपत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना भडकवल्याप्रकरणी त्यांना न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपत आहे.

सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते आणि इतर आठ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर मुंबई पोलीस सदावर्तेंची पोलीस कोठजी वाढवून घेण्याचा प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय साताऱ्यातही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने सातारा पोलीसही सदावर्तेंचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले होते. सातारा पोलीस आज सुनावणीवेळी सदावर्तेंच्या अटकेचे वॉरंट घेऊनच न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज न्यायालय सदावर्तेंची सुटका करणार की त्यांच्या अडचणी वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई न्यायालयाने 11 तारखेला सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली होती. रविवारी (१० एप्रिल) मुंबई पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेत, सीसीटीव्ही फुटेज, रजिस्टर, आणि इतर गोष्टी तपासण्यात आल्या. तसेच गेल्या आठ-दहा दिवसांत सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याचीही माहिती देखील पोलिसांनी घेतली.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरासमोर दगडफेक, चप्पलफेक केली. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सदावर्तेंंना २ दिवसांची तर इतर ११० जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT